
सामना प्रतिनिधी। लातूर
मराठा आरक्षणाच्या कारणावरुन तालूक्यातील मौजे माटेफळ येथील शिक्षक रमेश ज्ञानोबा पाटील यांनी गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेच्या निषेर्धात मराठा बांधवांच्या वतीने मुरुड येथे रास्ता रोको आंदोलन सुरु करण्यात आले आहे.
पाटील यांच्या मुलांना नोकरी लागत नसल्याने ते व्यथित होते. यामुळे आरक्षणाच्या आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. आरक्षणाच्या या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधावे यासाठी पाटील यांनी आत्महत्या केली.
त्यांचा मृतदेह मुरुड येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. त्यावेळी मुरुड येथील रुग्णालयासमोर मोठ्या संख्येने मराठा समाज बांधवांनी गर्दी केली होती. अचानक सर्वांनी थेट रास्ता रोको आंदोलन सुरु केले. मयत रमेश पाटील यांच्या मोठ्या मुलीस शासकीय नोकरीवर घेण्यात यावे तसे अश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले तरच रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात येईल असा पवित्रा घेऊन हे आंदोलन सुरु करण्यात आलेले आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.
summary…maratha andolen at murud

































































