
सामना प्रतिनिधी । हिंगोली
मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या संतप्त आंदोलनाचे पडसाद दुसऱ्या दिवशीही हिंगोली जिल्ह्यात उमटायला सुरुवात झाली आहे. हिंगोली येथून नरसी नामदेव, सेनगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर केसापूर पाटीजवळ बाभळीचे झाड आडवे पाडून वाहतूक रोखण्यात आली आहे.
या रास्तारोकोमुळे सकाळी साडेआठ वाजल्यापासून हिंगोली व सेनगावकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. या ठिकाणी केसापूर, घोटा देवी, नरसी नामदेवसह ठिकठिकाणचे मराठा समाज बांधव एकत्र आले आहेत.





























































