
>> प्रसाद नायगावकर, यवतमाळ
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्याच्या अंतरवाली सराटी येथे आंदोलन करणाऱ्या मराठा समाज बांधवावर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये अनेकजण जखमी झाले. यात समाज बांधवांवर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ आज यवतमाळ जिल्यातील दिग्रस येथे वडवाला जिनिग ते मानोरा चौकापर्यंत निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर मोर्च्याचे रूपांतर रस्तारोको करण्यात आले.
मोर्चामध्ये अनेकांनी विविध घोषणाबाजी केली. तसेच मराठा समाजावर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ व आंदोलनकर्तेवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत व मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसह मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते, या मोर्चामध्ये दिग्रस शहर व ग्रामीण भागातील मराठा समाजाचे युवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रास्तारोको आंदोलन हे शांतपूर्ण पद्धतीने झाले. यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता.

























































