
श्रीलंकेमध्ये आलेल्या महाप्रलयामुळे तिथली परिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे. पूर आणि भूस्खलनामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. आत्तापर्यंत या महाप्रलयात 56 जणांचा मृत्यू झाला असून, 600 हून अधिक घरांचं नुकसान झालेले आहे. अनेक घरे ढिगाऱ्याखाली गाढली गेली असून, कित्येक गावांचा संपर्कही तुटला आहे.
View this post on Instagram
या महाप्रलयाचा फटका अभिनेता सुयश टिळक यालाही बसला आहे. पूरपरिस्थितीमुळे इथल्या विमानतळावर आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. सुयश हा तब्बल २४ तासांपेक्षा अधिक काळ श्रीलंकेच्या विमानतळावर अडकून बसल्याचे त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत सांगितले. यासंदर्भातील काही फोटो आणि व्हिडीओ त्याने त्याच्या अकाऊंटवरून शेअर केले आहेत. त्याने कॅप्शनमध्ये असं लिहिले आहे की, “तो सामान्य दिवस नव्हता आणि हे फोटो/व्हिडीओ देखील सामान्य नाहीत… श्रीलंकेत मुसळधार पावसामुळे आणि चक्रीवादळामुळे हाहाकार पसरला असल्याचे त्याने सांगितले. तसेच त्याच्यासोबत याठिकाणी काय घडले हे सुद्धा त्याने पोस्टच्या माध्यमातून सांगितले आहे.
राष्ट्रीय आपत्ती असल्यामुळे तब्बल २४ तासांपेक्षा अधिक काळ तो आणि त्याच्यासमवेत त्याचे मित्र आणि ग्रुप अडकला होता. श्रीलंकेच्या ८५ टक्के भागाला पुराने वेढलेले असल्याने, खूप राष्ट्रीय नुकसान झाले होते. निर्माण झालेल्या महाप्रलयामुळे एअरपोर्टवर स्टाफही पोहोचला नव्हता, त्यामुळे एअरपोर्टवर अक्षरशः आणीबाणी निर्माण झाली होती. लोक पॅनिक होऊन एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत होते.



























































