वैभव मांगलेने सोडले अलबत्या गलबत्या नाटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्या नाटकाने लहानांपासून मोठ्या वयाच्या प्रेक्षकांपर्यंत बालनाट्याची क्रेझ पुन्हा रुजवली, त्या अलबत्या गलबत्या नाटकाला मुख्य कलाकार वैभव मांगले याने अलविदा केलं आहे. या नाटकातील चिंची चेटकीण ही भूमिका वैभव साकारत होता.

आता मात्र त्याने हे नाटक सोडल्याचं वृत्त आहे. वैभवच्या तारखा मिळत नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. वैभवने हे नाटक सोडल्यानंतर नाटकातील चिंची चेटकिणीची मध्यवर्ती भूमिका कोण साकारणार, ही उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

‘अलबत्या गलबत्या’चे दिग्दर्शन चिन्मय मांडलेकर याने केलं आहे. हे नाटक 1972 साली पहिल्यांदा रंगभूमीवर आलं होतं. त्यावेळी चिंची चेटकीण दिलीप प्रभावळकर यांनी साकारली होती. त्यानंतर जेव्हा पुन्हा हे नाटक रंगभूमीवर आलं तेव्हा वैभव मांगले ही भूमिका साकारत असे. त्याचा पहिला प्रयोग 12 मे 2018 रोजी झाला होता. नाटकाची निर्मिती झी मराठी आणि अद्वैत थिएटरने केली आहे. दिवसाला पाच प्रयोग करण्याचा विक्रमही या नाटकाने केला आहे. एप्रिल महिन्यातच या नाटकाने 500 प्रयोगांचा टप्पा पूर्ण केला होता.