‘लोकाधिकार’च्या मराठी भाषा दिनाची जोरदार तयारी

144

शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीने ‘मराठी भाषा दिवस’ येत्या 27 फेब्रुवारी रोजी साजरा केला जाणार आहे. त्या कार्यक्रमाची जोरदार तयारी करण्यात येत आहे. शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रमुख मार्गदर्शन या कार्यक्रमात लाभणार आहे. त्याप्रसंगी पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि सौ. रश्मी ठाकरे उपस्थित राहणार आहेत.

मरीन लाइन्स येथील मुंबई रुग्णालयाशेजारील बिर्ला मातुश्री सभागृहात 27 फेब्रुवारीला सायंकाळी 5 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. लोकाधिकार महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना नेते, खासदार गजानन कीर्तिकर, महासंघाचे कार्याध्यक्ष, शिवसेना नेते आनंदराव अडसूळ आणि महासंघाचे सरचिटणीस, शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला शिवसेनेचे सर्व नेते, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी, राज्य मंत्रिमंडळातील मंत्रीगण, महिला आघाडीच्या पदाधिकारी तसेच महासंघाच्या संलग्न समित्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. यावेळी जीवनकला अनामिका निर्मित व साईसाक्षी प्रकाशित बहिणाबाई चौधरी यांच्या जीवनावर आधारित ‘माझी माय सरसोती’ हा नृत्य-नाटय़ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या