ग्लॅमरच्या झगमगाटातील शिक्षणाची वाट

59

विद्येचेशिक्षणाचे महत्त्व हे वादातीत आणि कालातीत आहेअनेक मान्यरांनी ग्लॅमरच्या झगमगाटात शिक्षण सोडून दिल्याची अक्षरश: असंख्य उदाहरणे देता येतील. पण आजची कलाकारांची पिढी जागरुक आणि सतर्क झाली आहे. ग्लॅमरची ओढ असली तरी शिक्षण मागे पडत नाही. सखी गोखले या वोदित अभिनेत्रीने परदेशातील शिक्षणासाठी नाटक सोडल्याचे ताजे उदाहरण समोर आहे. ती जरी बोलण्यास उपलब्ध झाली नसली तरी नेहा गद्रे, येसूबाई म्हणजेच प्राजक्ता गायकवा या अभिनेत्रींनी ग्लॅमरच्या झगमगाटात पाय जमिनी ठेवू आपली शिक्षणाची बाजूही भक्कम केली आहे.

 

माझी क्षमता सिद्ध केली

आयुष्यात एखादं ध्येय निश्चित असेल तर कितीही काही अडचणी आल्या तरी तुम्ही ते पूर्ण करू शकता. मी कॉम्प्युटर इंजिनीयरिंग करतेय. खरं तर ‘नांदा सौख्य भरे’ मालिका करतानाच मी डिप्लोमा करत होते. मला अभिनय आणि शिक्षण या दोन्हीची प्रचंड आवड… माझा सीन नसेल तेव्हा मी पुस्तकं काढून वाचत बसते. परीक्षा असते तेव्हा सुट्टी घेऊन अभ्यास करते. म्हणूनच अभ्यास आणि अभिनय यात माझी कसरत होत नाही. पण प्रत्येक क्षणाला व्यग्र राहावे लागते. म्हणजे शूटिंग झाले की लगेच पुस्तके घेऊन बसते.

कॉम्प्युटरमध्ये प्रोग्रामिंग करतेय. त्यामुळे एक संकल्पना समजली की तिची फक्त रिविजन करत राहते. अभ्यासाची माझी ही पद्धत आहे. आता ‘संभाजी’ मालिका मिळाली आहे. त्यामुळे ती जबाबदारी सांभाळतच मी सुरुवातीपासूनच अभ्यास करायला सुरुवात केली आहे. त्यासाठी पहाटे चार वाजता उठते. अभ्यास करते. त्यानंतर माझा दिवस सुरू होतो. खरं तर सेटवर मला सगळेजण सांगतात, तुम्ही अभिनयच करा. शिक्षण का घेताय, पण मी त्यांना सांगते. माझ्यात जेवढी क्षमता आहे ती मला माहीत आहे, ती फक्त सिद्ध करायची आहे. सुदैवाने घरचा पाठिंबा आहे.

मला नवीन नवीन गोष्टी शिकायला फार आवडतात. त्यामुळे दोन्ही कसे मॅनेज करेन हा प्रश्नच उभा राहत नाही. शिवाय तुमच्यात जिद्द आणि सातत्य असेल तर कुठलीच गोष्ट अशक्य नसते. ‘संभाजी’ मालिकेतील माझी भूमिका प्रेक्षकांना आवडतेय. मी सर्वसामान्य कपड्यात बाहेर गेले तरी लोकं पहिला मुजरा करतात आणि मग बोलायला सुरुवात करतात. ती कामाची पोचपावती असते. आता जे आम्ही करतोय ते लोकांपर्यंत पोहोचतंय, लोकांना आवडतंय. त्यामुळे अभिनयाबरोबरच अभ्यास करायला आणखी प्रोत्साहन मिळते. आता एकच लक्ष्य आहे… ते म्हणजे शिक्षण पूर्ण करायचंय.

प्राजक्ता गायकवाड


अखेर मास्टर्स केलंच

लहानपणापासून मला ट्रान्सलेटर व्हायचं होतं. ‘मन उधाणं वार्‍याचे’ ही पहिली मालिका आली, तेव्हा मी जेमतेम अठरा एकोणीस वर्षांची होते. फर्ग्युसनमध्ये जर्मन भाषेत ग्रॅज्युएशन सुरू होतं. या मालिकेनंतर मला आणखी बर्‍याच मालिका मिळाल्या. त्यामुळे मास्टर्स करण्यासाठी मला वेळच मिळाला नाही. पण २०१३ नंतर मात्र मी ठरवलं आणि दोन वर्षांचा ब्रेक घेतला. त्या काळात मी पुणे विद्यापीठातून जर्मन विषयात मास्टर्स केले.

खरं तर माझी आई शिक्षिका आहे. त्यामुळे घरात शिक्षणाला फार महत्त्व आहे आणि त्या प्रकारचेच माझ्यावर संस्कार झाले आहेत. कुठल्याही क्षेत्रात गेलीस तरी ग्रॅज्युएशन पूर्ण करणे गरजेचेच आहे. पण माझे ध्येय होते की निदान मास्टर्स तरी करायचे. लहानपणापासून मला भाषांमध्ये फार आवड आहे. त्यामुळे मला ट्रान्सलेटर किंवा इंटरप्रिटेटर होऊन कॉर्पोरेट क्षेत्रात काम करायचं होतं. पण नकळत मी अभिनय क्षेत्रात आले. आता इथे रमलेय. पण तरीही एक मन मास्टर्स करण्याकडे खुणावत होतं. माझं ग्रॅज्युएशन सुरू होतं तेव्हाही मी मालिकेत काम करत होते. पण मास्टर्स करण्यासाठी ब्रेक घेणं आवश्यक होतं. अखेर ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. अभिनय आणि मास्टर्स करणं मला शक्यच नव्हतं. म्हणून ब्रेक घ्यावाच लागला. घेतलेल्या निर्णयावर मी ठाम राहिले. ‘एकापेक्षा एक’ ही माझी अखेरची मालिका… ती झाल्यावर थोडा गॅप मिळाला. आज मी अभिमानाने सांगू शकते की जर्मन भाषेत मास्टर्स केलंच.

नेहा गद्रे

आपली प्रतिक्रिया द्या