
>> स्नेहा काटकर
मराठी लोकांचे आवडते पदार्थ बटाटा वडा आणि झणझणीत मिसळ तिकिटावर मिळणार आहेत. हिंदुस्थानी टपालाने मराठी पदार्थ तिकिटावर आणले आहेत.
हिंदुस्थानी टपालाने मराठी खाद्यपर्थावर आधारित काही तिकीट जारी केले आहेत. एका कार्यक्रमात या तिकिटांचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे भगत सिंह कोश्यारी, सुप्रसिद्ध शेफ संजीव कपूर, गांधी संग्रहालयाच्या अध्यक्षा उषा ठक्कर उपस्थित होत्या.
महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त @IndiaPostOffice च्यावतीने आयोजित मुंबई जिल्हास्तरीय दोनदिवसीय दुर्मिळ टपाल तिकीट प्रदर्शनाचे राज्यपाल @BSKoshyari यांच्या हस्ते उद्घाटन. गांधीवादी उषा ठक्कर, मुख्य पोस्ट मास्तर जनरल हरिषचंद्र अग्रवाल आदी उपस्थित#MahatmaGandhi pic.twitter.com/4iDEeBUfAf
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) November 6, 2019
संजीव कपूर यांनी या तिकिटांचे अनावरण केले तेव्हा कपूर यांनी उपस्थितांशी संवाद साधला. कपूर म्हणाले की, “मुंबईत आधी बाकरवडी खूप प्रसिद्ध होती. दुकानात बाकरवडी विकत घेण्यास गेल्यास बाकरवडी संपली असे उत्तर मिळायचे.” आपण बर्याच ठिकाणी फिरलो परंतु महाराष्ट्रीय पदार्थांची चव ही वेगळीच आहे असे कपूर म्हणाले. तसेच महाराष्ट्रीय पदार्थांना जास्त प्राधान्य मिळावे म्हणून हिंदुस्थानी डाक विभागाने नवीन तिकीट जारी केल्याचे त्यांनी नमूद केले.






















































