
शिवसेना शाखा क्र. 192 तर्फे शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे यांच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘मराठी मने चेतविती, गड-दुर्गांची छाती’ या दिनदर्शिका 2026 चे प्रकाशन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेना भवन येथे करण्यात आले. या दिनदर्शिकेत छत्रपती शिवरायांच्या 12 गडदुर्गांची उत्कृष्ट छायाचित्रे तसेच त्यांचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील 11 व तामीळनाडूतील एक असे 12 गडदुर्ग जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट झाल्याने प्रत्येक मराठी मनाला अभिमान वाटावा अशी ही उल्लेखनीय बाब आहे.
‘मराठी मने चेतविती, गड-दुर्गांची छाती’ ही दिनदर्शिका शिवसेना नेते अंबादास दानवे, शिवसेना सचिव सूरज चव्हाण, उपनेते अरुण दुधवडकर, अशोक धात्रक, पुणे जिल्हा सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर, संपर्कप्रमुख मनोहर मढवी आदींना भेट देण्यात आली. यावेळी शाखा क्र. 192 चे शाखा समन्वयक रविकांत पडयाची, सुशांत गोजारे, शेखर यादव, चंद्रकांत झगडे आदी उपस्थित होते.



























































