
71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण 23 सप्टेंबर रोजी झाले. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते साऊथ सुपरस्टार मोहनलाल यांना सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले. या सोहळ्यावर मराठीचीही छाप होती. ‘श्यामची आई’ हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला. निर्मात्या अमृता राव यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ‘नाळ-2’ चित्रपटासाठी श्रीनिवास पोकळे, त्रिशा ठोसर, भार्गव जगताप यांना, तर ‘जिप्सी’साठी कबीर खंदारे या बालकलाकाराला गौरविण्यात आले.