मराठीत पहिल्यांदाच 11 भागांची मालिका!

898

खास गणेशोत्सवासाठी स्टार प्रवाह वाहिनीवर 11 दिवसांची गणपती विशेष मालिका दाखवण्यात येणार आहे. ‘देवा श्री गणेशा’ असे मालिकेचे नाव असून ती 22 ऑगस्टपासून रात्री 8.30 वाजता प्रसारित होईल.

चौसष्ट कलांचा अधिपती असणाऱ्या बाप्पाविषयीच्या अनेक गोष्टी आपण लहानपणापासून ऐकत आलोय. पण या गोष्टींमागे असणाऱ्या अनेक रहस्यमयी कथांबद्दल आपल्याला फारशी माहिती नाही. उदाहरण द्यायचं झालं तर गणेशोत्सव काळात चंद्रांचं तोंड पाहू नये अन्यथा चोरीचा आळ येतो असं ऐकिवात आहे. बाप्पाची झालेली फजिती पाहून चंद्र हसला आणि बाप्पाने चंद्राला शाप दिला ही गोष्ट प्रचलित आहेच. मात्र चंद्राला शाप दिलेल्या बाप्पाच्या भाळी चंद्र कसा, बाप्पा भालचंद्र कसा झाला याची कथा मात्र बऱ्याच जणांना माहीत नाही. ‘देवा श्री गणेशा’ या 11 भागांच्या विशेष मालिकेतून अशा पौराणिक गोष्टींचा उलगडा होणार आहे.

महाभारत, राधेकृष्ण यांसारख्या भव्यदिव्य मालिका साकारणारे निर्माते सिद्धार्थ तिवारी यांच्या स्वस्तिक प्रोडक्शन्सने ही भव्य मालिका साकारण्याचं आव्हान पेललं आहे. उमरगाम इथे या बिग बजेट मालिकेचा भव्यदिव्य सेट साकारला असून शूटिंगला सुरुवात झाली आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या