निवासी डॉक्टरांना मिळणार दहा हजार कोविड भत्ता, ’मार्ड’च्या शिष्टमंडळाला आयुक्तांचे आश्वासन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांतील निवासी डॉक्टरांना रखडलेला दहा हजार रुपयांचा ‘कोविड भत्ता’ लवकरच मिळणार आहे. याबाबत ‘मार्ड’ संघटनेच्या शिष्टमंडळाला पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी आश्वासन दिल्याची माहिती ‘मार्ड’कडून देण्यात आली.

पालिकेसह राज्यातील सरकारी रुग्णालयांतील निवासी डॉक्टरांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी दोन दिवस ‘काम बंद’ आंदोलन केले. याचा मोठा फटका सरकारी रुग्णालयांत येणाऱया गोरगरीबांना बसला.

अखेर सरकारच्या मध्यस्थीनंतर दुसऱया दिवशी संप मागे घेण्यात आला. यावेळी झालेल्या वाटाघाटीनुसार ‘मार्ड’ संघटनेने आज पालिका आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली. हॉस्टेलसह प्रलंबित मागण्यांबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे आश्वासनही पालिका प्रशासनाकडून निवासी डॉक्टरांना देण्यात आले.