एक-दोन नव्हे तर शरीरावर केल्या 50 शस्त्रक्रिया, ही आहे खऱ्या आयुष्यातील ‘व्हॅम्पायर वूमन’!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मेक्सिकोमधील एक महिला खऱ्या आयुष्यातील ‘व्हॅम्पायर वूमन’ म्हणून ओळखली जाते. शरीरावर सर्वाधिक बदल करण्याचा जागतिक विक्रम एकेकाळी तिच्या नावावर होता. तिचे नाव मारिया जोस क्रिस्टना मेंडेस आहे. आणि ती ‘व्हॅम्पायर वूमन’ म्हणून ओळखली जाते. कौटुंबिक हिंसाचारावर मात केल्यानंतर विजयाचे प्रतीक म्हणून मारियाने तिच्या शरीरात पहिला बदल करून घेतला.

मारियाने वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी पहिला टॅटू गोंदवून घेतला आणि आता तिच्या संपूर्ण शरीरावर एकूण ५० टॅटू आहेत. जे लोक असेच काही करू इच्छितात त्यांच्यासाठी मारियाने एक आवाहन केले आहे. मारिया म्हणते की, तरुणांनी शरीरात बदल करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करावा. मारियाने तिच्या शरीराचा 99% भाग टॅटूंनी व्यापला आहे. आणि तिने शरीरावर एकूण 50 बदल आहेत. यामध्ये तिच्या कपाळावर आणि हातांवर इम्प्लांट्स, पिअर्सिंग्ज आणि दोन भागांत विभागलेली जीभ यांचा समावेश आहे. २०२४ मध्ये तिने जगातील सर्वाधिक टॅटू असलेली महिला हा किताब माजी लष्करी सैनिक एस्पेरान्स फर्झिनाकडे गमावला, जिने गेल्या दशकात आपल्या शरीराचा ९९.९८% भाग शाईने झाकून टोकाचे पाऊल उचलले होते. डेली स्टारने हे वृत्त दिले आहे.

मारियाला स्वत:चे टॅटू आवडत असले तरी ती तरुणांना सावध करते. मारिया म्हणते की, मी तुम्हाला सल्ला देईन की तुम्ही याबद्दल खूप काळजीपूर्वक विचार करा. कारण ते नंतर बदलता येणार नाही. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना मारिया पुढे म्हणाली की, टॅटू आणि बॉडी मॉडिफिकेशन फॅशनेबल झाले आहेत. त्यामुळे आपण अशा टप्प्यावर पोहोचू शकतो जिथे ते अनेकांना पसंतीचे वाटणार नाही. म्हणून तुम्ही याबद्दल खूप खोलवर विचार करावा जेणेकरून तुम्ही आयुष्यभर त्यावर प्रेम करू शकाल आणि त्याचे समर्थन करू शकाल. मारियाने वयाच्या 14 व्या वर्षी तिचा पहिला टॅटू गोंदवून घेतला. तिने सांगितले की, तिच्या हातांमध्ये आणि डोळ्यांमध्ये इम्प्लांट्स बसवणे हे सर्वात वेदनादायक अनुभव होते. पण तिने आग्रह धरला की, जर मला बरे वाटले आणि माझ्या आरोग्याने परवानगी दिली तर, मी टॅटू गोंदवत राहीन.