
सीमा शुल्क विभागाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर 19 कोटी 65 लाखांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त केला. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली.
विमानतळावर सीमा शुल्क विभागाने गेल्या दोन दिवसात दोन कारवाई केल्या. मंगळवारी बँकॉक येथून दोन प्रवासी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले. त्या दोघांच्या हालचाली संशयास्पद वाटत असल्याने त्याना ताब्यात घेतले. त्याच्याकडून 11 किलो 64 ग्रॅम गांजा जप्त केला. बुधवारी दोन प्रवासी फुकेत येथून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले. त्या दोघांना ताब्यात घेतले. त्याच्याकडून 8 किलो गांजा जप्त केला. या हायड्रोपोनिक गांजाची तस्करी करणाऱ्या चारही ड्रग्जतस्करांना सीमा शुल्क विभागाने अटक केली. त्यांच्याकडून जप्त केलेल्या गांजाची पिंमत 19 कोटी 65 लाख इतकी आहे.