Pulwama Attack – हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईकराचा उत्स्फुर्त प्रतिसाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज मुंबईकरांनी ठिकठिकाणी कडकडीत बंद पाळला. अनेकांनी बाजारपेठा, दुकाने बंद ठेवून निषेध नोंदवला. तसेच पाकिस्तान आणि दहशतवाद्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. दक्षिण मुंबई, मध्य मंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरात देखील नागरिकांनी दुकाने बंद ठेवत निषेध नोंदवला.

दक्षिण मुंबईतील सहारा सारा मार्केट, मुसाफिरखाना, मशीद बंदर, झवेरी बाजारसह इतर मोठ्या बाजारपेठांमधील बहुतांश व्यापाऱ्यांनी बंद पाळला. प्रभादेवी, वरळी, दादर परिसरातील काही भागात देखील नागरिकांनी पुलवामा हल्ल्याचा निषेध नोंदवून बंद पाळला. त्याचसोबत पूर्व आणि पश्चिम उपनगरातील बाजारपेठा देखील बंद ठेवण्यात आल्या होत्या.