
जगभरातील खगोलप्रेमींसाठी खुशखबर आहे. मंगळ आणि शुक्र या दोन ग्रहांची युती होणार आहे. 13 जुलै रोजी दुर्बिणीचा वापर न करता हे अद्भुत दृश्य बघता येणार आहे.
पृथ्वीच्या शेजारचे मंगळ आणि शुक्र हे दोन ग्रह सोमवार आणि मंगळवारी एकमेकांच्या जवळ येणार आहेत. ते इतके जवळ येतील की, साध्या डोळ्यांनीही सूर्यास्तानंतर ही खगोलीय घटना आपल्याला बघता येईल. मंगळ आणि शुक्र एकमेकांपासून 0.5 डिग्री दूर दिसतील. ते पृथ्वीवरून सहज दिसू शकतील. या युतीत चंद्राचाही हिस्सा असेल.
खगोल भौतिक संस्थानच्या मते, मंगळ आणि शुक्र ग्रह 13 जुलै रोजी 4 अंशाने जवळ येतील. हिंदुस्थानात तर सोमवारीच हे दुर्मीळ दृश्य दिसले तर पुढचे काही दिवस अद्भुत नजारा दिसत राहील. आकाश निरभ्र असेल तर देशातील कोणत्याही कानाकोपऱयातून ग्रहांची युती दिसेल. दोन्ही ग्रहांना दुर्बिणीच्या मदतीने एका फ्रेममध्ये बघता येईल.



























































