मसाला पाव

3

साहित्य : २ चमचे लोणी, २ चमचे लसणाची पेस्ट, १ बारीक चिरलेला कांदा, १ शिमला मिरची, ४ टोमॅटो, २ चमचे पाव-भाजी मसाला, २ चमचे लाल तिखट, चवीनुसार मीठ, चिरलेली कोथिंबीर.

कृती : तव्यावर २ चमचे लोणी घालायचे. त्यावर २ चमचे लसणाची पेस्ट परतून घ्यायची. नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, शिमला मिरचीचे छोटे तुकडे, चिरलेले टोमॅटो घालून पुन्हा परतून घ्यावे. वरून २-२ चमचे पावभाजी मसला आणि लाल तिखट घालून मिसळून घ्यावे. यामध्ये चवीनुसार मीठ घालावे. त्यानंतर सर्व मिश्रण तव्यावरच हलकेसे पावभाजीसारखे स्मॅश करावे. नंतर पावाला लोणी लावून ते तव्यावर गरम करावेत. त्यामध्ये तयार केलेली भाजी भरावी. वरूनही हाच मसाला लावा. त्यावर आवडत असल्यास बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि सर्व्ह करा.