मस्साजोग पोटनिवडणुकीसाठी 83.69% मतदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी मंगळवारी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत 83.69 टक्के मतदान झाले. संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख आणि स्वरूपानंद देशमुख यांच्यात सरपंच पदासाठी थेट लढत होत आहे.

मंगळवारी सकाळपासूनच मतदारांनी रांगा लावून मतदान केले. उन्हाचा जोर वाढल्यानंतर मतदान केंद्र ओस पडले. मात्र मावळतीला पुन्हा रांगा लागल्या. मतदानाची वेळ संपेपर्यंत 83.69 टक्के मतदान झाले होते. यात 1101 पुरुषांनी, तर 983 स्त्रियांनी मतदानाचा हक्क बजावला. संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांची निवड बिनविरोध व्हावी अशी मस्साजोगच्या ग्रामस्थांची इच्छा होती. परंतु मागच्या वेळी केवळ नऊ मतांनी पराभूत झालेले स्वरूपानंद देशमुख यांनी लढण्याचा निर्णय जाहीर केला.