बद्रीनाथांच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केदारनाथ-बद्रीनाथ धामच्या दर्शनासाठी देशातील कानाकोपऱयांतून हजारो भाविकांनी या ठिकाणी गर्दी केली आहे. सोमवारी सकाळी बद्रीनाथ धाम मंदिराच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी एकच गर्दी केली होती. यावेळी भाविकांकडून ‘जय बद्री विशाल’ असा जयघोष करण्यात येत होता. केदारनाथ, बद्रीनाथ, यमुनोत्री आणि गंगोत्रीचे आतापर्यंत 2.38 लाख भाविकांनी दर्शन घेतले.

महाराष्ट्र राज्य अव्वल ठरले. महाराष्ट्रात 1708, उत्तर प्रदेश 1243, दिल्ली 876, तेलंगणा 864, कर्नाटक 801 आणि गुजरात 700 तिकीट बुकिंग झाली.