कोलकात्यात ममता बॅनर्जींचा अतिविराट मोर्चा, एसआयआरविरोधात पश्चिम बंगाल रस्त्यावर

महाराष्ट्रानंतर पश्चिम बंगालमध्येही मतचोरीच्या विरोधात असंतोषाचा लाव्हा उसळला आहे. मतदार फेरतपासणी (एसआयआर)च्या भीतीने सात जणांना जीव गमवावा लागल्यानंतर कोलकात्यात मंगळवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली एसआयआरविरोधात विराट मोर्चा काढण्यात आला. लाखोंच्या संख्येने नागरिक या मोर्चात सहभागी झाले. ’एसआयआर म्हणजे निवडणूक प्रक्रिया ताब्यात घेण्याचा केंद्रातील भाजप सरकार व निवडणूक आयोगाचा छुपा कट आहे. बंगालच्या मतदार यादीतून एकही पात्र उमेदवार वगळला गेला तर ती भाजप सरकारच्या पतनाची सुरुवात असेल,’ असा इशारा ममतांनी यावेळी दिला.