‘मास्टर’ला तुफान गर्दी; थिएटर मालकाला दंड

दाक्षिणात्य सुपरस्टार थालापती विजय आणि विजय सेतुपति यांच्या अॅक्शन थ्रीलर ’मास्टर’ या चित्रपटाने अक्षरशः प्रेक्षकांना याडं लावलंय. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने जगभरात 56 कोटी रुपयांची घसघशीत कमाई केली आहे. लॉकडाऊननंतर थिएटर सुरू झाल्यानंतर बंपर ओपनिंग मिळवलेला हा पहिलाच चित्रपट ठरला आहे. केवळ 50 टक्के प्रेक्षकांची अट असतानादेखील हा चित्रपट पाहण्यासाठी दक्षिणेकडील राज्यांतील थिएटरमध्ये प्रेक्षकांची तोबा गर्दी उसळली. कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे चेन्नईतील काशी थिएटरच्या मालकाला दंड भरावा लागला आहे.

‘मास्टर’ हा चित्रपट 13 जानेवारीला तमीळ, तेलुगू आणि कन्नड भाषेत प्रदर्शित झाला आहे. 50 टक्के प्रेक्षकांची अट असतानाही केवळ हिंदुस्थानात या चित्रपटाने 42 कोटींची कमाई केली आहे. जर थिएटर 100 टक्के क्षमतेसह सुरू झाले असते तर या चित्रपटाने 84 कोटी रुपयांच्या घरात कमाई केली असती. ही कमाई ‘बाहुबली 2’ या चित्रपटापेक्षा अधिक असती. ‘बाहुबली 2’ने तमीळ, तेलुगू, मल्याळममध्ये 80 कोटींची ओपनिंग होती.

 

आपली प्रतिक्रिया द्या