अनमोल बिश्णोईला दिल्लीत अटक

माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्या कटाचा मुख्य सूत्रधार अनमोल बिश्णोई याला आज दिल्लीत अटक करण्यात आली. एनआयएच्या अधिकाऱयांनी दिल्लीतील इंदिरा गांधी विमानतळावर त्याला ताब्यात घेतले. पटियाला हाऊस कोर्टाने त्याला 11 दिवसांची कोठडी सुनावली आहे. अनमोन हा गँगस्टर लॉरेन्स बिश्णोईचा भाऊ आहे. अमेरिकेने हद्दपारीची कारवाई केल्यानंतर त्याचे हिंदुस्थानकडे प्रत्यार्पण केले. त्याच्यावर बाबा सिद्दिकी, गायक सिद्धू मुसेवाला यांची हत्या, सलमानच्या घरावर गोळीबारासह 18 पेक्षा अधिक गंभीर गुन्हे आहेत.