मातंग समाजाचे मंगळवारी आझाद मैदानावर आंदोलन 

अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण करावे, या मागणीसाठी सकल मातंग समाजाच्या वतीने मंगळवार, 20 मे रोजी आझाद मैदानावर जन आक्रोश महाआंदोलन आयोजित केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट 2024 रोजी देशातील अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षणाअंतर्गत उपवर्गीकरण करण्यासंदर्भात या समाजघटकातील आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहिलेल्या समाजाला आरक्षण देण्याचे अधिकार राज्यांना दिले आहेत, पण अद्याप सरकारने याचा निर्णय घेतलेला नाही.