फिक्सिंग संपवणे अवघड- गावसकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयपीएलमधील फिक्ंिसगमुळे हिंदुस्थानची आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की झाल्यानंतर बीसीसीआयसह आयसीसीनेही क्रिकेटला लागलेली ही कीड मुळासकट नष्ट करण्यासाठी पावले उचलली. मात्र आता तामीळनाडू प्रीमियर लीग (टीएनपीएल) आणि कर्नाटक प्रीमियर लीग (केपीएल) या टी-20 स्पर्धेतून पुन्हा एकदा मॅच फिक्सिंगने हिंदुस्थानी क्रिकेटमध्ये शिरकाव केला आहे. या प्रकरणावर हिंदुस्थानचे माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी परखड मत व्यक्त करताना म्हटले की, क्रिकेटमधील फिक्सिंगच्या या किडीवर औषध नाही. फिक्ंिसग संपवणे अवघड आहे.

सुनील गावसकर पुढे म्हणाले, हाव ही एक अशी गोष्ट असते की, तिच्यापुढे शिक्षण, मार्गदर्शन व सेमिनार सर्व व्यर्थ ठरते. क्रिकेटमध्येही विविध स्वभावांचे व वेगवेगळय़ा गुणांचे खेळाडू असतात. त्यामुळे त्यातील काही खेळाडू सहजपणे फिक्सिंगच्या जाळय़ात अडकतात. याच कारणामुळे सर्व खेळाडूंना फिक्सिंगपासून दूर ठेवणे अवघड गोष्ट आहे.

खेळाडूंना वाटते आपण फिक्सिंग केली तरी सापडू शकणार नाही. मात्र विविध कोनांतून तुमच्यावर अनेक कॅमेऱयांची नजर असते हे ते रीतसर विसरतात आणि एक दिवस अलगदपणे त्यांचे पितळ उघडे पडते. त्यामुळे खेळाडूंनी स्वतःहून फिक्सिंगपासून दूर राहिले पाहिजे एवढा एकच त्यावर पर्याय आहे.

तामीळनाडू प्रीमियर लीग व कर्नाटक प्रीमियर लीग या दोन्ही स्पर्धा हिंदुस्थानातील युवा खेळाडूंसाठी स्वतŠचे कौशल्य दाखवण्यासाठी उत्तम व्यासपीठ आहे. यामुळे दोन्ही राज्यांतील कानाकोपऱयांतील युवा खेळाडूंना आपला खेळ दाखवण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे  अशा स्पर्धांना सहकार्य करणे तेवढेच गरजेचे आहे.