माटुंगा रेल्वे कारखान्यात शंभर टक्के उपस्थितीचे मध्य रेल्वेचे आदेश

638

राज्यात सरकारने अनलॉक करताना कामगारांची 10 ते 15 टक्के उपस्थिती ठेवण्याचे आदेश दिलेले असताना मध्य रेल्वेने मात्र माटुंगा कारखाना चालू करण्यासाठी 100 टक्के उपस्थिती राखण्याचे आदेश मोबाईल व्हॉट्सअ‍ॅपवरून कर्मचाऱ्यांना पाठविले आहेत. आधीच कारखाने 33 टक्के कामगारांच्या उपस्थितीत सुरू असून, आणखीन कामगार वाढल्यास कामगारांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची भीती असल्याने रेल कामगार सेनेने शंभर टक्के उपस्थितीच्या आदेशाला तीव्र विरोध केला आहे.

4 जुलै रोजी रेल्वे प्रशासनाद्वारे मोबाईल व्हॉट्सअ‍ॅपवर सर्व कामगारांना मेसेज पाठवून 6 जुलैपासून कामगारांनी शंभर टक्के उपस्थित रहावे असे म्हटले आहे. माटुंगा कारखान्यातील बहुसंख्य कामगार ठाणे, कल्याण, अंबरनाथ, डोंबिवली, कर्जत, कसाराहून कामाला येत असतात. तसेच वेस्टर्न रेल्वेच्या कामगार बोरीवली, वसई, विरार, पालघर येथून मुंबईत नोकरीसाठी येत असतात. त्यांच्यासाठी रेल्वे वर्वâमन्स स्पेशल गाड्या सोडण्यात आल्या तरी त्यांची संख्या अपुरी असल्याने काही गाड्यांना ‘सोशल डिस्टन्सिंग’चे उल्लंघन होत आहे.

माटुंगा कारखान्याचे अनेक कामगार 55च्या पुढील वयोगटातील असून त्यांना दमा, डायबेटीक, हृदयविकार असल्याने त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. रेल कामगार सेना माटुंगा युनिट अध्यक्ष संदेश मलुष्टे, सरचिटणीस चंद्रकांत विनरकर, उपाध्यक्ष सुर्यकांत आंबेकर, सचिन मयेकर, बाळाराम शिरीषकर, दत्ता अदाते, चिंतामणी निखारगे यांनी मध्य रेल्वे प्रशासनाला 33 टक्के उपस्थितीत कारखाना चालविण्यात यावा अन्यथा आंदोलन पुकारण्यात येईल असा इशारा दिला.

पालिका जी.एन. वॉर्ड ऑफिसरकडे माटुंगा कारखाना प्रशासनाविरोधात तक्रार पत्र सादर करताना शिवसेना रेल कामगार सेना माटुंगा युनिट अध्यक्ष संदेश मलुष्ट्ये, सरचिटणीस चंद्रकांत विनरकर, उपाध्यक्ष सुर्यकांत आंबेकर, उपसचिव बाळाराम शिरीषकर आदी.

आपली प्रतिक्रिया द्या