मौनी अमावस्या किंवा माघ अमावस्येला काय करावे ?

2816

शास्त्रानुसार दान केल्याने मोठे पुण्य लाभते. दान करण्यासाठी माघ महिन्यातील अमावस्या ही सगळ्यात उत्तम असते असे सांगितले जाते. 24 जानेवारी रोजी म्हणजे शुक्रवारी ही अमावस्या आहे. आजच्याच दिवशी शनि महाराज आपली चाल बदलणार आहेत. आजच्या दिवशी अनेक जण मौन व्रत धारण करतात म्हणून या अमावस्येला मौनी अमावस्या असेही म्हणतात. या अमावस्येसंदर्भातील आणखी काही गोष्टी जाणून घेऊयात

 

  • मौनी अमावस्येला माघ अमावस्या असेही म्हणतात
  • आजच्या दिवशी ऋषीमुनींप्रमाणे आचरण करावे असे सांगितले जाते.
  • या अमावस्येला मौन व्रत धारण करून दान करण्याची पद्धत आहे
  • मौनी अमावस्येला शनिशांतीचेही उपाय केले जातात
  • या अमवास्येला शनिदेवाची पूजा केली जाते
  • पितरांना शांति लाभावी यासाठी गाय, कुत्रा आणि कावळ्याला पोळी खायला दिली जाते
  • या अमावस्येच्या दिवशी कोणत्याही स्वरुपाच्या वादापासून दूर राहावे असे सांगितले जाते.
  • मौनी अमावस्येला गंगेत स्नान केल्यास आणि दान दिल्यास अधिक पुण्य लाभते असे म्हणतात

अमावस्येला सुरुवात 23 जानेवारीला पहाटे 2 वाजून 18 मिनिटांनी सुरुवात झाली असून ती 25 जानेवारीच्या पहाटे 3 वाजून 12 मिनिटांपर्यंत असेल असं बहुतांश दिनदर्शिकांमध्ये नमूद केलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या