मौसमी चटर्जी यांच्या कन्येचे निधन

3185

ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चटर्जी यांची कन्या ‘पायल डिकी सिन्हा’ हिचे गुरुवारी रात्री निधन झाले. पायल ‘ज्युवेनाईल डायबिटीजने’ ग्रस्त होती व कोमात होती. 2017 पासून तिची तब्येत सातत्याने बिघडत होती. अनेकवेळा तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर गुरुवारी रात्री दोनच्या सुमारास डिकीची प्राणज्योत मालवली.

वर्षभरापासून पायल कोमात होती. 28 एप्रिलला डिकी यांनी पायलला घरी आणले. पण डिकी पायलची जाणीवपूर्वक योग्य देखभाल करत नसल्याचा आरोप मौसमी चटर्जी व त्यांचे पती जयंत यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी जावई डिकी विरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात खटला दाखल केला. पालक म्हणून पायलची देखभाल करण्याची संमती देण्यात यावी अशी विनंती न्यायालयाला केली होती. डॉक्टरांनी पायलला फिजियोथेरपी व डाएटचा सल्ला दिला होता. पण डिकी यांनी पायलवरील सर्व उपचार बंद केल्याचा आरोप चटर्जी यांनी केला होता.

पायलचा विवाह 2010 साली उद्योगपती डिकी सिन्हा याच्याबरोबर झाला होता. मौसमी यांचे पती जयंत, मुलगी पायल आणि डिकी सिन्हा एकाच कंपनीचे संचालक होते. पण 2016 साली त्यांच्यात वाद झाला होता. तेव्हापासूनच त्यांच्या नात्यात वितुष्ट निर्माण झाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या