मयूर म्हात्रे ठरला ‘अलिबाग श्री’चा मानकरी

461

रायगड जिल्हा बॉडी बिल्डर्स फेडरेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेत  अलिबागच्या डिवाईन एनर्जी जिमचा मयूर प्रभाकर म्हात्रे याने अलिबाग श्री 2019 हा किताब पटकावला. मयूर यालाच बेस्ट पोझर म्हणून गौरविण्यात आले.

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी स्व. महेंद्र पाटील  यांच्या स्मरणार्थ  पी. एन. पी. नाट्य संकूलात अलिबाग श्री शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. अलिबाग श्री किताबासाठी  ॠषिकेश म्हात्रे (मयेकर जिम कुरूळ), मयूर म्हात्रे (डिवाईन एनर्जी जिम अलिबाग), केदार पेडणेकर (डिवाईन एनर्जी जिम अलिबाग) , संदिप कांबळे (मयेकर जिम करूळ) यांच्यात चुरस होती. मयूर म्हात्रे याने बाजी मारून अलिबाग श्री 2019 किताब पटकावला.  त्यालाच बेस्ट पोझर म्हणून गौरविण्यात आले.

रायगड जिल्हा बॉडीबिल्डर्स फेडरेशनतर्फे बाळू पवार यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. उत्कृष्ट व्यायामशाळा पुरस्कार सार्वजनिक व्यायामशाळा वाडगाव यांना देण्यात आला. आदर्श प्रशिक्षक म्हणून सुनील राणे यांना गौरविण्यात आले. रायगड जिल्हा बॉडीबिल्डर्स फेडरेशनचे अध्यक्ष अ‍ॅड. किरण कोसमकर, उपाध्यक्ष प्रभाकर मोहिते, सेक्रेटरी सचिन पाटील, अ‍ॅड. महेश मोहिते आदिंच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या