एमबीए, एमएमएस सीईटीसाठी नोंदणी करण्यास मुदतवाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एमबीए, एमएमएस या व्यावसायिक पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी सेलमार्फत घेण्यात येणाऱया सीईटी प्रवेश परीक्षेस नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थी 9 ते 11 मार्चपर्यंत परीक्षा नोंदणी करू शकतात. ही सीईटी प्रवेश परीक्षा 18 व 19 मार्च रोजी घेण्यात येणार होत्या, मात्र आता या परीक्षा 25 व 26 मार्च रोजी घेण्यात येणार आहेत.

सुरुवातील परीक्षा नोंदणीची मुदत 6 मार्च होती. मात्र काही पालक, विद्यार्थी, विद्यार्थी संघटना यांनी मुदत वाढविण्यासाठी प्रत्यक्ष भेटून, दूरध्वनी, ई-मेलद्वारे परीक्षा नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ मागितल्याने विद्यार्थीहित लक्षात घेता परीक्षा नोंदणीसाठी अंतिम मुदतवाढ सीईटी सेलने दिली आहे.