विधानसभेत विधेयक मंजूर ; 12 वीच्या गुणांच्या आधारे ‘एमबीबीएस’ला प्रवेश

MBBS Exam
तामिळनाडूत मेडिकलसाठी ‘नीट’ नव्हे तर थेट प्रवेश 

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेली राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षाच अर्थात ‘नीट’ तमिळनाडू सरकारने रद्द केली असून, याविषयीचे विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले आहे. यापुढे तमिळनाडूत 12 वी विज्ञान शाखेतील गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, होमिओपॅथी अभ्यासक्रमाला थेट प्रवेश दिला जाणार आहे. मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी विधानसभेत विधेयक मांडले. विरोधीपक्ष अण्णा द्रमुकने विधेयकाला पाठिंबा दिला. मात्र, भाजपने विरोध एका १९ वर्षीय विद्यार्थ्याने ‘नीट’ प्रवेश परीक्षेत अपेक्षित स्कोअर न आल्यामुळे आत्महत्या केली होती. यानंतर तमिळनाडूत हे प्रकरण तापले होते. ‘नीट’ची प्रवेश परीक्षाच राज्यात रद्द करण्याचे आश्वासन द्रमुकने दिले होते. त्यानंतर आज विधेयक मांडण्यात आले आणि त्याला मंजुरी मिळाली.

सामाजिक न्याय देण्याचा प्रयत्न

समाजातील सर्व घटकांना सामाजिक न्याय देण्यासाठी ‘नीट’ची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 12 वीतील गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना मेडिकलला प्रवेश मिळेल. समान संधी सर्व घटकांना यामुळे मिळणार आहे, असे मुख्यमंत्री स्टॅलिन म्हणाले. या विधेयकामध्ये सरकारी शाळांमध्ये बारावी विज्ञानाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता वैद्यकीय प्रवेशात 7.5 टक्के आरक्षणही देण्यात आले आहे. गरीब विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल.

केवळ ‘नीट’ परीक्षाच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा निकष ठरत नाही

‘नीट’मुळे वैद्यकीय शिक्षणात सामाजिक असमतोल राखला जातो का? हे तपासण्यासाठी द्रमुक सरकारने न्यायमूर्ती राजन यांची कमिटी नेमली होती.

वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी ‘नीट’ प्रवेश परीक्षा हा एकमेव निकष असू शकत नाही. ‘नीट’ परीक्षेमुळेच केवळ विद्यार्थ्यांची गुणवत्ता सिद्ध होत नाही, असे राजन कमिटीने म्हटले आहे.

‘नीट’ परीक्षेच्या आधीही तमिळनाडूत अनेक वैद्यकीय शिक्षण संस्था होत्या. या संस्थांमधून चांगले शिक्षण दिले जात आहे. त्यामुळे ‘नीट’ परीक्षाच हवी हा आग्रह नको.

आपली प्रतिक्रिया द्या