#मी-टू मच- रोज नवे प्रकरण, रोज नवा आरोप; दिग्गज पिंजऱ्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

लैंगिक शोषणाविरुद्ध सुरू झालेल्या ‘मी टू’ मोहिमेने बॉलीवूडमध्ये खरोखरच मोठा धमाका केला आहे. रोज नवे प्रकरण बाहेर येत आहे, सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून रोज नवा आरोप होत आहे आणि दिग्गजांना आरोपीच्या पिंजऱयात उभे केले जात आहे. यातील किती आरोप खरे आणि किती फिल्मी याचा फैसला होणे बाकी असले तरी ‘मी टू-मच’ मोहीम बॉलीवूडसाठी धक्कादायकच ठरली आहे.

नाना पाटेकरसह चौघांवर गुन्हा दाखल
अभिनेत्री तनुश्री दत्तासोबत केलेल्या गैरवर्तणूक प्रकरणात अभिनेते नाना पाटेकर, गणेश आचार्य, सामी सिद्दिकी आणि राकेश सारंग यांच्याविरोधात कलम 354 आणि 509 अंतर्गत ओशिवरा पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री गुन्हा दाखल झाला. दरम्यान, या चौघांना समन्स बजावण्यापूर्वी साक्षीदारांची जबानी घेतली जाणार आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे.

अकबर यांना मायदेशी परतण्याचा आदेश
तब्बल सहा महिला पत्रकारांनी लैंगिक शोषणाचा आरोप केलेले भाजपचे केंद्रीय मंत्री आणि ‘जानेमाने’ पत्रकार एम. जे. अकबर यांना नायजेरिया येथून ताबडतोब मायदेशी परतण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. त्यामुळे हिंदुस्थानात परतताच मंत्रिमंडळातून अकबर यांची हकालपट्टी होण्याची दाट शक्यता भाजपमधील सूत्रांनी व्यक्त केली आहे.

summary- me too campaign having new exposure every day