लहान मुलांना महागाईचा डोस, मोदी सरकारने 21 औषधांच्या किमती 50 टक्क्यांनी वाढवल्या

422
प्रातिनिधीक फोटो

अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीमुळे त्रस्त झालेल्या जनतेला केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने आणखी झटका दिला आहे. बालकांसाठी अत्यावश्यक असणाऱया ‘बीसीजी लस’च्या किंमतीत 50 टक्के वाढ करून लहान मुलांनाही महागाईचा डोस दिला आहे. त्याचप्रमाणे कुष्टरोग, ऍलर्जी, मलेरिया, ताप, सर्दीवरील गोळय़ा महागल्या आहेत. 21 औषधांची दरवाढ केली आहे.

केंद्र सरकारच्या नॅशनल फार्मास्यूटिकल प्राईजिंग ऍथॉरिटीच्या (एनपीपीए) बैठकीत 21 औषधांवरील दरवाढीला मंजुरी देण्यात आली. विशेष म्हणजे 9 डिसेंबर रोजी सोमवारी झालेल्या दरवाढीचा निर्णय शनिवारी जाहीर करण्यात आला आहे.

हृदयशस्त्र्ाक्रियेसाठी आवश्यक असणाऱया स्टेंटस आणि ऑर्थोपेडिक इंम्प्लामेंटच्या किंमती कमी केल्याचे सरकारचे म्हणणे आहे. मात्र, लहान मुलांच्या डोससह कुष्ठरोगासाठीच्या आवश्यक औषधांच्या किंमती तब्बल 50 टक्क्यांनी वाढविल्या आहेत.

प्रमुख औषधांची दरवाढ
– बीसीजी लस – प्रत्येक बालकासाठी हा डोस अत्यावश्यक आहे. ‘टीबी’ प्रतिबंधक लस म्हणून वापर केला जातो. या दरवाढीचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर होणार आहे.
– क्लोरोक्वाईन – मलेरिया झालेल्या रुग्णांसाठी अत्यावश्यक गोळी आहे.
– डॅटसोन – कुष्ठरोगावरील गोळी
– व्हिटॅमिन-सी – प्रदूषणामुळे देशात सर्वत्र ऍलर्जीचे प्रमाण वाढले आहे. ऍण्टी ऍलर्जिक म्हणून व्हिटॅमिन-सी गोळी प्रभावी आहे.
– मेट्रोनिडाझोल – बॅक्टेरियामुळे (जिवाणू) अनेक आजार होतात. सर्दी, ताप तसेच पोट, आतडय़ाचे इन्फेक्शन होते. त्यावर उपचार म्हणून या गोळीचा वापर केला जातो.

आपली प्रतिक्रिया द्या