
घरगुती गॅस आणि पेट्रोल डिझेलच्या दरवाढीने जनता होरपळत असताना आता रोजच्या वापरातील 800 औषधांचे दर तब्बल 10 टक्क्यांनी वाढले आहेत. 1 एप्रिलपासून ही दरवाढ लागू होणार आहे. औषधांच्या दरवाढीने गोरगरीब सर्वसामान्यांना मोठा फटका बसणार आहे.
मार्च 2020 पासून देशभरात कोरोनाचा फैलाव झाल्यापासून या औषध पंपन्या औषधांच्या किमती वाढवण्याची मागणी करीत होत्या. त्यामुळे ‘एनपीपीएन’ने आता रोजच्या वापरातील औषधांचे दर 10.7 टक्क्यांनी वाढवण्याला मंजुरी दिली आहे. घाऊक महागाई दरात वाढ झाल्याने ही दरवाढ करीत असल्याचे ‘एनपीपीएन’ने म्हटले आहे. दरवाढ झालेल्या औषधांमध्ये ताप, हृदयविकार, उच्च रक्तदाब, त्वचारोग आणि अशक्तपणा यांसारख्या औषधांचा समावेश आहे. परिणामी पेनकिलरसह पॅरासिटामॉल, अॅण्टीबायोटिक्स, फेनिटोइन सोडियम, मेट्रोनिडाझोल यांसारख्या औषधांचा समावेश आहे.
म्हणूनच वाढल्या किमती
औषधनिर्मितीसाठी लागणाऱया कच्च्या मालाच्या किमती गेल्या वर्षांत प्रचंड वाढल्या असून मनुष्यबळावरही मोठा खर्च होत असल्याचे औषध निर्मात्या पंपन्यांचे म्हणणे आहे.
गेल्या दोन वर्षांत पॅरासिटामॉलच्या किमती 130 टक्क्यांनी वाढल्या आहेत. यातच वेगवेगळय़ा प्रकारचे सिरप, ड्रॉप आणि वैद्यकीय वापर होत असलेल्या ग्लिसरीनच्या किमती 263 टक्क्यांनी, पॉपीलीन ग्लायकोल 83 टक्क्यांनी वाढल्या आहेत.
‘एनपीपीएन’ ठरवते पिंमत
अधिसूचित औषधे राष्ट्रीय अत्यावश्यक औषधांच्या यादीत येतात. यामध्ये अँटीबायोटिक, व्हिटॅमिन, शुगर आणि रक्तदाब अशा औषधांचा समावेश होतो. देशात सुमारे 1.6 लाख कोटी रुपयांचे फार्मास्युटिकल मार्पेट आहे. यामध्ये अधिसूचित औषधांचा वाटा 18 टक्के आहे. नॅशनल फार्मास्युटिकल प्रायसिंग अॅथोरॉटी या औषधांच्या किमती निश्चित करते.




























































