
सामना ऑनलाईन । बेंगळुरू
अवकाशात होणाऱ्या हालचाली, ग्रह-ताऱ्यांमध्ये होणारे बदल, सूर्यमाला, दीर्घिका अशा अनेक गोष्टींबद्दल शास्त्रज्ञांना कुतूहल वाटत आलं आहे. आपल्या सूर्यमालेव्यतिरिक्त अवकाशात अन्य कुठेही दुसरी पृथ्वी आहे का, याचा शास्त्रज्ञ सतत शोध घेत आहेत. या सगळ्यांध्ये सर्वात जास्त कुतूहल लाभलेली गोष्ट म्हणजे एलियन.
या एलियन किंवा परग्रहवासीयांना शोधण्यासाठी बेंगळुरूत एक भलीमोठी दुर्बीण बसवण्यात आली आहे. मीअरकॅट असं या दुर्बिणीचं नाव आहे. हा प्रकल्प साउथ आफ्रिकन रेडिओ अॅस्ट्रोनोमी ऑबझर्व्हेटरीच्या संयुक्त विद्यमाने साकारण्यात आला आहे. ही दुर्बीण अवकाशातील एक हजारहून अधिक ग्रह ताऱ्यांचा अभ्यास करणार असून त्यात एलियनच्या अस्तित्वासंबंधीचा शोध घेणार आहे. मीअरकॅट ही दुर्बीण दिवसाचे चोवीस तास आणि आठवड्याचे सातही दिवस कार्यरत असणार आहे.
आफ्रिकेतील वाळवंटी प्रदेशात आढळणाऱ्या मीअरकॅट या प्राण्याच्या नावावरून या दुर्बिणीचं नाव मीअरकॅट ठेवण्यात आलं आहे. एका जागी उभं राहून मीअरकॅट ज्या प्रमाणे वाळवंटाचं निरीक्षण करत असतात, त्याच प्रकारे ही दुर्बीण काम करणार आहे.
summary- meerkat telescope for searching aliens

























































