लोकल प्रवाशांचे आज मेगाहाल होणार, मध्य आणि हार्बरसह पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

उपनगरीय लोकल प्रवाशांचे रविवारी मेगाहाल होणार आहेत. मध्य रेल्वेसह हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर नियमित देखभाल-दुरुस्तीसह तांत्रिक कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी घराबाहेर पडताना कोणत्या मार्गावर कोणत्या वेळेत मेगाब्लॉक आहे याची चौकशी करूनच बाहेर पडणे गरजेचे आहे.

z मध्य रेल्वे मार्गावर ठाणे-कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 9.30 ते दुपारी 2.45 या वेळेत सुटणाऱया डाऊन जलद सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. तसेच कल्याण येथून सकाळी 10.28 ते दुपारी 3.25 पर्यंत सुटणाऱया अप जलद सेवा कल्याण आणि ठाणेदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवल्या जाणार आहेत.

z हार्बर मार्गावर कुर्ला-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे सीएसएमटी येथून सकाळी 10.34 ते दुपारी 3.36 या वेळेत पनवेल, बेलापूर, वाशीकरिता सुटणाऱया हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. तसेच वाशी, बेलापूर, पनवेल येथून ब्लॉक कालावधीत सीएसएमटीसाठी सुटणाऱया सेवा रद्द राहतील. दरम्यान, ब्लॉक कालावधीत सीएसएमटी-कुर्ला आणि वाशी-पनवेलदरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.

z पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली-जोगेश्वरी स्थानकादरम्यान सकाळी 10.35 ते 3.15 वेळेत पाचव्या लाईनवर जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत.