संडे मेगाब्लॉकने ‘मरे’च्या प्रवाशांचे वांदे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रतिनिधी । मुंबई

दर रविवारच्या मेगाब्लॉकची सवय अंगवळणी पडलेल्या मध्य रेल्वेच्या प्रवाशांचा हल्ली अधिकच अंत पाहिला जात आहे. साधारण 3 ते 3.30च्या दरम्यान दुरुस्तीचा ब्लॉक संपत असतानाही सायंकाळची 6 ते 6.30ची वेळ झाली तरी लोकलचा काही थांगपत्ता नसल्याने प्रवाशांचे दर रविवारी प्रचंड हाल होतात.

मध्य रेल्वेने रविवारी कल्याण ते ठाणेदरम्यान डाऊन जलद मार्गावर पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी सकाळी 10.30 ते दुपारी 3.30 दरम्यान घेतलेल्या ब्लॉकमुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. हार्बर मार्गावरही पनवेल वाशी अप आणि डाऊन लाइनवर प्रवाशांचे हाल झाले.