शिवसेना विभाग क्रमांक 1 च्या वतीने आज महारक्तदान शिबीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विभाग क्र. 1 च्या वतीने उद्या रविवार, 2 एप्रिल रोजी महारक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. मागाठाणे विधानसभा क्षेत्रात बोरिवली (पूर्व) नॅन्सी डेपोसमोरील पाटीदार समाज हॉलमध्ये सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत हे रक्तदान शिबीर होणार आहे. या शिबिराचे उद्घाटन शिवसेना सचिव सूरज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील शिवसेना शाखा क्र. 3, 4, 5, 11, 12, 14, 25, 26 या शाखा रक्तदान शिबिरात सहभागी होणार आहेत. आमदार विलास पोतनीस यांच्या मार्गदर्शनाखाली विभागप्रमुख उदेश पाटेकर व महिला विभाग संघटक सुजाता पाटेकर, विधानसभा संघटक अशोक म्हामुणकर यांनी या शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिराला प्रबोधन गोरेगाव संचालित मीनाताई ठाकरे रक्तपेढी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाचे सहकार्य लाभले आहे. एक हजारहून अधिक रक्तदाते यावेळी रक्तदान करणार आहेत.