
देशभरातील केंद्रीय विद्यालय संघटन आणि नवोदय विद्यालय समितीमध्ये विविध पदांची भरती करण्यात येत आहे. या दोन्ही ठिकाणी एकूण 14 हजार 967 पदांसाठी भरती केली जाणार आहे. या पदांमध्ये सहायक आयुक्त, प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल, पदव्युत्तर शिक्षक (पीजीटी), प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (टीजीटी), लायब्रेरी शिक्षक, प्राथमिक शिक्षक, फायनान्स ऑफिसर, सहायक अभियंता, ज्युनिअर ट्रान्सलेटर, स्टेनो ग्रेड 1, स्टेनो ग्रेड 2, मल्टी टास्किंग स्टाफ अशी विविध पदांची भरती केली जाणार आहे. भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अखेरची तारीख 11 डिसेंबर 2025 पर्यंत आहे. अर्ज करणाऱया आणि पात्र ठरलेल्या उमेदवारांना परीक्षेची तारीख नंतर कळवली जाईल. या भरतीसंबंधी सविस्तर अधिकृत माहिती https://kvsangathan.nic.in या वेबसाईटवर देण्यात आली आहे. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतभर असणार आहे.
केंद्रीय विद्यालय संघटन
असिस्टंट कमिश्नर – 08
प्रिन्सिपल – 134
व्हाईस प्रिन्सिपल – 58
पदव्युत्तर शिक्षक (पीजीटी) – 1465
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (टीजीटी) – 2794
लायब्रेरियन – 147
प्राथमिक शिक्षक – 3365
ऍडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर – 12
फायनान्स ऑफिसर – 05
असिस्टंट इंजिनीअर – 02
असिस्टंट सेक्शन ऑफिसर – 74
ज्युनियर ट्रान्सलेटर – 08
सिनिअर सेक्रेटेरिएट असिस्टंट – 280
ज्युनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट – 714
स्टेनो ग्रेड – 113
स्टेनो ग्रेड – 257
नवोदय विद्यालय समिती
असिस्टंट कमिश्नर – 09
प्रिन्सिपल – 93
पदव्युत्तर शिक्षक – 1513
पदव्युत्तर शिक्षक – 18
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक – 2978
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (टीजीटी) – 443
ज्युनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट – 46
ज्युनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट – 552
लॅब अटेंडंट – 165
मल्टी टास्किंग स्टाफ – 24



























































