
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबईत रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे ब्लॉकच्या काळात लोकलसेवा 15 ते 20 मिनीटे उशीराने धावणार आहेत. मध्य रेल्वेवर कल्याण-ठाणे आणि हार्बर मार्गावरील वडाळा रोड-मानखुर्द स्थानकादरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेच्या कल्याण ते ठाणे स्थानकादरम्यान अप जलद मार्गावर सकाळी 10.54 ते दुपारी 3.52 या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या स्थानकादरम्यान जलद मार्गावारील गाड्या धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत.त्यामुळे लोकलसेवा 15 ते 20 मिनीटे उशीराने धावणार आहेत. हार्बर मार्गावर वडाळा रोड ते मानखुर्द स्थानकादरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक काळात हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी पनवेल-मानखुर्द स्थानकादरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. ब्लॉक काळात प्रवाशांना सकाळी 10 ते सायंकाळी 4.30 वाजेपर्यंत मध्य आणि ट्रान्सहार्बरवरून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.




























































