
मध्य रेल्वेच्या ठाणे-कल्याणदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 10ः40 ते दुपारी 3ः40 पर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून (सीएसएमटी) सकाळी 9ः34 ते दुपारी 3ः03 पर्यंत सुटणाऱ्या अप आणि डाऊन जलद, सेमी-जलद लोकल ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावर वळवल्या जातील. हार्बर मार्गावर वडाळा रोड-मानखुर्ददरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11 ते संध्याकाळी 4 पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार असून या काळात यादरम्यानच्या फेऱ्या बंद राहतील. पनवेल-मानखुर्द-पनवेल मार्गावर विशेष लोकल चालवल्या जातील. या काळात हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10 ते संध्याकाळी 4ः30 पर्यंत ट्रान्स हार्बर लाइन व मुख्य मार्गिकेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.