
‘देशातील सध्याचे वातावरण भीतीदायक आहे. अल्पसंख्याकांवरील हल्ल्याच्या घटना सुरूच असून महात्मा गांधी व पंडित नेहरूंचा हिंदुस्थान आता लिंचिस्थान झाला आहे,’ अशी टीका पीडीपीच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनी आज केली. ‘बांगलादेशात हिंदू बांधवांची हत्या झाल्यामुळे प्रचंड गदारोळ उठला आहे, मात्र अशाच घटना आपल्याकडेही होतात. अखलाकपासून सुरू झालेले हे लिंचिंग आजही थांबताना दिसत नाही. हे वातावरण देशाच्या भविष्यासाठी धोकादायक आहे,’ असे त्या म्हणाल्या. दरम्यान, राज्य सरकारच्या नव्या आरक्षण धोरणाविरोधात आंदोलनाची हाक देणाऱया मुफ्ती यांच्यासह अनेक नेत्यांना नजरकैदेत ठेवले आहे.




























































