मेहंदी आर्टिस्टची लाखोंची फसवणूक

गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देतो असे सांगून मेहंदी आर्टिस्टसह एकाने 9 गुंतवणूकदारांची 83 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी चेंबूर पोलिसांनी एकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

तक्रारदार हे मेहंदी आर्टिस्ट असून त्यांच्या एका महिला सहकारीने बकरी खरेदी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यक्तीकडे एक लाख रुपये गुंतवल्यास तो पाच हजार रुपये दर महिन्याला व्याज देतो असे सांगितले. आपणही त्याच्याकडे 3 लाख रुपयांची गुंतवणूक केली असून दर महिन्याला पंधरा हजार रुपये व्याज म्हणून मिळत असल्याचे सांगितले. तिच्या सांगण्यावरून तक्रारदाराने गुंतवणूक केल्यावर 50 हजार रुपये व्याजाची रक्कम तक्रारदारास दिली. मात्र मार्चनंतर व्याजाची रक्कम देणे बंद केले. फोनला प्रतिसाद देणेही बंद केले. चौकशीदरम्यान त्याने अनेक लोकांकडून पैसे घेऊन फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे.