माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नॅसकॉम संस्थेसोबत पाच वर्षांसाठी सामंजस्य करार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात राज्य अग्रेसर राहण्यासाठी नॅसकॉम सोबत झालेला करार महत्वपूर्ण असून यामुळे राज्यातील माहिती तंत्रज्ञानाशी निगाडीत उद्योगांना चालना मिळणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नामवंत संस्था नॅसकॉमसोबत राज्यशासनाच्या उद्योग विभागाने पाच वर्षांसाठी सामंजस्य करार केला आहे. या करारानुसार नॅसकॉमची ‘टेक्नोलॉजी अँड लीडरशिप फोरम’ ही परिषद पुढील पाच वर्षांसाठी महाराष्ट्रात होणार आहे. या परिषदेअंतर्गत जागतिक गुंतवणूकदार राज्यात आकर्षित होणार आहेत.

उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सतीश गवई, आणि नॅसकॉमचे उपाध्यक्ष केशव मुरुगेश यांनी या सामंजस्य करारावर सही केली. नॅशनल असोसिएशन ऑफ सर्विसेस अँड सॉफ्टवेर कंपनी म्हणजे नॅसकॉम ही माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील शिखर संस्था असून पुढील वार्षिक 5 वर्षे महाराष्ट्रातील नॅसकॉम टेक्नोलॉजी अँड लीडरशिप फोरम – वार्षिक आयोजन करण्यासाठी करारबद्ध झाली आहे. राज्यानेही या पाच वर्षात या परिषदेचे अधिकृत आयोजक म्हणून संमती दिली आहे. अनेक राज्य ही परिषद त्यांच्या राज्यात व्हावी यासाठी प्रयत्न करित होते. मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने या परिषदेचे आयोजन महाराष्ट्रात होत आहे. येत्या फेब्रुवारीला ग्रॅण्ड हयात येथे 20 ते 22 फेब्रुवारी 2019 या कालावधीत ही परिषद संपन्न होणार आहे. जागतिक स्तरावरील या परिषदेला उद्योग जगतातील दिग्गज, तंत्रज्ञान प्रचारक, शासकीय अधिकारी आणि जगभरातील माध्यम प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. आयटी आणि संलग्न उद्योग क्षेत्रातील ही परिषद जागतिक स्तरावर महत्वपूर्ण मानली जाते.