दिवा-पेण आणि वसई मार्गावर ‘मेमू’ धावणार; एकूण आठ फेऱ्या होणार

249

सामना प्रतिनिधी, मुंबई

मध्य रेल्वेने वसई रोड – दिवा – पनवेल – पेण विभागात ‘मेमू’ ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते या नव्या ‘मेमू’ सेवेचे उद्घाटन होणार असून सोमवारपासून प्रत्यक्षात ही सेवा प्रवाशांसाठी सुरू होणार आहे. वसई रोड – दिवा – पनवेल – पेण विभागात एकूण ‘मेमू’च्या आठ फेऱया होणार आहेत.

शनिवार आणि रविवार वगळून आठवड्याच्या पाच दिवस ‘मेमू’ सेवा उपलब्ध होणार आहे. ‘मेमू’मध्ये डिझेल इंजिनऐवजी इलेक्ट्रिकल इंजिनचा समावेश केला जातो. नुकतेच मध्य रेल्वेने पनवेल ते पेणपर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण केलेले आहे. त्यामुळे ‘डेमू’ ऐवजी ‘मेमू’ चालविणे शक्य झाले असून प्रवाशांचा त्यामुळे फायदा होणार आहे.

summary- memu train for diva pen and vasai

आपली प्रतिक्रिया द्या