फेसबुकवरून झाली तोंडओळख, अडकले थेट लग्नबंधनात, जाणून घ्या त्यांचं वय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फेसबुकवरून मैत्री आणि मैत्रीचं प्रेमात रुपांतर, या घटना हल्ली काही नवीन नाहीत. आजच्या तरुणाईला अशाच पद्धतीने लग्नबंधनात अडकण्याचा मार्ग सोपा वाटू लागला आहे, मात्र वयस्कर व्यक्तिही याला अपवाद नाहीत.

शकील जाहिद (60) यांनी 1984 साली पहिले लग्न केले होते. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी अशी तीन मुले आहेत. शिवाय 8 नातवंडेही आहेत. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर शकील एकटे पडले होते. त्यांच्या मुलांनीच त्यांचे दुसरे लग्न करून देण्याचा निर्णय घेतला. याच दरम्यान त्यांची फेसबुकवर त्यांची मैत्री मदिहा नावाच्या तरुणीशी झाली. तीही स्वत:करिता जोडीदाराच्या शोधात होती.

काही दिवसांत फेसबुकच्या या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. आश्चर्य म्हणजे शकील यांच्या मुलांनीच त्यांचे दुसरे लग्न मदिहासोबत ठरवले. दोघांनी एका मुलाखतीत त्यांची प्रेमकहाणी शेअर केली आहे. त्यांच्या प्रेमकथेचा व्हिडियोही व्हायरल केला आहे. शकील यांनी सांगितले की, फेसबुकवरून मदिहासोबत मैत्री झाल्यानंतर तिच्या प्रेमात पडल्यावर मदिहाला प्रपोज केले. पहिल्या पत्नीचे निधन झाल्यामुळे मुलांनी मदिहासोबत लग्न करण्यासाठी मला विनंती केली. एकटेपणा अत्यंत वाईट आहे, असे वाटले त्यामुळे लग्न करण्याचा निर्णय घेतला.

मदिहाने सांगितले की, त्यांनी अतिशय आदरपूर्वक एकमेकांना प्रपोज केले होते. मदिहा म्हणाली की, जेव्हा ती शकील यांना भेटली तेव्हा त्यांनी तिच्याकरिता एक शेर म्हटला, त्यामुळे त्याचा अर्थ असा की, ‘मी खूप दिवसांनी फुलत आहे, मला स्वतःला भेटल्यासारखे वाटत आहे…’ मुलाखतीदरम्यान तिला विचारण्यात आले की, शकीलने कुटुंबाची आणि लग्नाची माहिती दिली होती की नंतर ती समोर आली? या प्रश्नावर मदिहा म्हणाली की, मी आधीच सर्व गोष्टी सांगितल्या होत्या.

त्याचवेळी शकीलच्या मुलाने सांगितले की, अम्मीच्या मृत्यूनंतर अब्बू एकटा पडला होता. अशा स्थितीत जी पोकळी पत्नी दूर करू शकते, ती दुसरी कोणीही दूर करू शकत नाही. यामुळेच आम्ही त्याला लग्नासाठी राजी केले.