मेट्रोची 52 उन्नत स्थानके ‘हरित स्थानके’ म्हणून विकसित

सामना ऑनलाईन । मुंबई

एमएमआरडीएची दहिसर ते डी. एन. नगर मेट्रो-2-अ, डी. एन. नगर ते मंडाले मेट्रो -2 ब आणि अंधेरी (पूर्व )ते दहिसर (पूर्व )मेट्रो मार्ग -7 वरील एकूण 52 उन्नत स्थानके इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (आयजीबीसी)च्या ग्रीन एम.आर.टी.एस. मानांकनानुसार विकसित करण्यात येणार आहेत. याचाच अर्थ या तीन मार्गांवरील 52 स्थानकांना ती पूर्ण झाल्यावर ‘हरित प्रमाणपत्र’ प्राप्त होईल. ही आयजीबीसी संस्था आणि ‘कॉण्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री’ यांनी संयुक्तपणे हा निर्णय घेतला आहे. ही स्थानके ग्रीन स्थानके करण्यासाठी खालीलप्रमाणे उपाययोजना करण्यात येणार आहेत.

  • हरित स्थानकांवर 100 टक्के एलईडी दिव्यांचा वापर
  • ऊर्जा स्नेही आणि अत्याधुनिक उपकरणांचा वापर
  • जिने आणि उद्वाहनासाठी व्ही.व्ही.व्ही.एफ. तंत्रज्ञानाचा वापर
  • सर्व उन्नत स्थानके, कार डेपो इत्यादींमध्ये सौरऊर्जेचा वापर
  • कार्बन उत्पन्न होऊ न देणारी ब्रेक व्यवस्था
  • नैसर्गिक ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर