एमजी मोटर इंडियाने ‘हेक्टर प्लस’चे उत्पादन केले सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एमजी मोटर इंडियाने हेक्टर प्लसचे व्यावसायिक उत्पादन सुरू केले. हलोल येथील अत्याधुनिक प्रकल्पात तयार झालेली हेक्टर प्लस ही ऑटोएक्सपो 2020 मध्ये सर्वप्रथम सादर करण्यात आली होती. जुलै 2020 मध्ये ती विक्रीस उपलब्ध असेल.

हेक्टर प्लस ही हिंदुस्थानातील पहिली इंटरनेट कार आहे. कारच्या मधल्या रोमध्ये कॅप्टन सीट आहे. त्यामुळे प्रवाशांना सर्वोत्कृष्ट आरामाचा अनुभव मिळेल. कौटुंबिक गरजांसाठी तिसऱ्या रोचाही समावेश करण्यात आला आहे. ही हाय अपिल एसयूव्ही नव्या प्रीमियम लुकमध्ये असेल. यात हेडलँप्स, फ्रंट ग्रिल, फ्रंट आणि रिअर बंपर्स, नवी रिअर टेल लाइट डिझाइन आणि रिव्हाइज्ड स्कीड प्लेट्स असतील.

सध्याच्या नियमांसह उत्पादनासंबंधी नियमांचे पालन करून एमजीचा हलोल येथील प्रकल्प जागतिक स्तरावरील उत्पादन मानदंडांनुसार काम करीत आहे. वाहनांची विविध प्रकारे कठोर चाचणी घेण्यात येत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या गुजरातमधील प्रकल्पात आधुनिक रोबोटिक स्पॉट वेल्डिंग, रोबोटिक रोलर हेमिंग आणि रोबोटिक ब्रेझिंग फॅसिलिटीज असून याद्वारे सर्वोत्कृष्ट वेल्डिंग आणि डायमेंशनल कंसिस्टन्सी मिळते. यातील पेंट शॉपमध्ये उत्तम पेंट फिनिश मिळवण्यासाठी तसेच रंगसंगती साधण्यासाठी कोटिंगचे सर्व टप्पे रोबोटिक अॅप्लीकेशनद्वारे पार केले जातात.