मी वेगळा : छंदातून ऊर्जा

103

मी वेगळा : छंदातून ऊर्जा ः चंद्रकांत पां. खटावकर 

‘श्रीमती’ हे पान… सदर केवळ आम्हा स्त्रियांसाठी राखीव. ‘मी वेगळी’ हे सदर समस्त स्त्रियांना स्वतःतील वेगळेपण ओळखता यावे म्हणून… पण आता या सदराला पुरुष वाचकांकडूनही उत्साहात प्रतिसाद मिळतो आहे. या उत्स्फूर्त प्रतिसादाची दखल म्हणून केवळ यावेळेपुरता

chandrakant-khatavkarशाळेत असल्यापासूनच मला चित्रकलेची आवड. तसे आमचं कुटुंबच कलाप्रेमी. वडिलांना कलेची आवड नाटक, पत्रलेखन ,ड्रॉईंग मध्ये त्यांनाही रस. तसा मी जे जे स्कुल ऑफ आर्टचा विदयार्थी. कमर्शियल आर्टिस्ट ही पदवी मिळाल्यानंतर आर्टिस्ट म्हणून काम करण्याची इच्छा पेपर प्रॉडक्ट कंपनीत काही दिवस कामही केले पण काही कारणामुळे तीही नोकरी सोडली आणि मी दुसऱ्याच व्यवसायात रमलो. पण तोही व्यवसाय काही दिवसच केला .मग एक दुकान घेऊन माशाचे इक्वेरियम उघडले. आता मी 66 वर्षाचा आहे. सध्या घरीच आहे पण तरीही माझी कला मला स्वस्थ बसू देत नव्हती. घरी बसून काहीतरी करावे असे नेहमीच वाटे. मग डोक्यात एक शक्कल आली. टाकाऊ वस्तूपासून काहीतरी शोभेच्या वस्तू बनवाव्यात ही त्यामागची कल्पना. यासाठी मी काही बिनकामाच्या प्लास्टिकच्या बाटल्या जमा केल्या त्यापासून विविध प्राणी,पक्षी ,मासे इत्यादी तयार केले त्याचप्रमाणे वृत्तपत्राच्या पेपरपासून बदकाची चोच,प्राण्यांचे विविध अंग तयार केले. त्यानंतर आइस्क्रीमच्या काडयापासून बस,विमान, मोटार याची प्रतिकृतीही तयार केली. त्यांना छान रंग दिला .माझ्या या कलेचं एक प्रदर्शनं भरवाव अशीही माझी इच्छा आहे. घरी आलेल्या लोकांनी या वस्तू पाहिल्या की त्यांच्या कौतुकाने मन भरून येते, अधिक काम करण्याची ऊर्जा मिळते आणि माझ्यातल्या कलेचे चीज झाल्यासारखे वाटते .

आपली प्रतिक्रिया द्या