ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ दिग्गज कर्णधाराला झालाय कॅन्सर, सोशल मीडियाद्वारे भावूक आवाहन

1812

ऑस्ट्रेलियाच्या एका दिग्गज खेळाडू आणि माजी कर्णधाराला त्वचेचा कॅन्सर (Skin Cancer) झाला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून या खेळाडूने आपल्याला स्किन कॅन्सर (Skin Cancer) झाल्याची माहिती दिली आहे. ‘तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी ध्या आणि सूर्याच्या अतिनिल किरणांपासून वाचा’, असे आवाहन या क्रिकेटपटूने केले आहे.

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि दिग्गज खेळाडू मायकल क्लार्क (Michael Clarke) याचा त्वचेचा कॅन्सर झाला आहे. त्वचेच्या कॅन्सरशी लढणाऱ्या क्लार्कने काही दिवसांपूर्वी यावर उपचार घेतले होते. पॉण्टिंगनंतर ऑस्ट्रेलियाचे कर्णधारपद भूषवणारा क्लार्क संघातील महत्वाचा खेळाडू होता. कॅन्सरशी लढणाऱ्या क्लार्कने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्याच्या कपाळावरील टाके दिसत आहेत.

फोटो शेअर करताना मायकलने एक भावूक आवाहन देखील केले आहे. तरुणांनी त्वचेची काळजी घ्यावी. सूर्याच्या अतिनिल किरणांपासून योग्य तो बचाव करावा, असे आवाहन त्याने केले आहे. क्लार्कच्या या पोस्टवर ऑस्ट्रेलियाचा जलतरणपटू ग्राँट हॅकेट आणि पाकिस्तानचा क्रिकेटपटू अहमद शहजाद यांनी कमेंट केली आहे.

जबरदस्त कारकीर्द

ऑस्ट्रेलियाकडून मायकल क्लार्कने 115 कसोटी, 245 वनडे आणि 34 टी-20 सामने खेळले आहेत. कसोटीमध्ये त्याने 28 शतकांसह 8 हजार 643 धावा केल्या आहेत. 329 ही त्याची सर्वोच्च खेळी आहे. तर वनडे मध्ये त्याने 8 शतके आणि 7 हजार 981 धावा केल्या आहेत. मायकल क्लार्कने 2011मध्ये रिकी पॉण्टिंगकडून कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतली होती. 2015च्या अॅशेस मालिकेनंतर त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.

आपली प्रतिक्रिया द्या