मायक्रोमॅक्स इन ब्रँड अंतर्गत बाजारात आणणार स्मार्टफोन

हिंदुस्थानातील इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, मायक्रोमॅक्स इंफॉरमॅटिक्स लिमिटेडने आज स्मार्टफोन सेगमेंट मध्ये पुनरागमन करण्याच्या निमित्ताने त्यांचा स्वतःचा सब ब्रँड “इन” चे अनावरण केले आहे.

मायक्रोमॅक्सचे सह-संस्थापक राहुल शर्मा यांनी आज कंपनीच्या डिजिटल हँडल्सवर त्यांच्या ब्रँड ‘इन”चे प्रक्षेपण केले. “इन” ब्रँडबद्दल माहिती देतांना ते म्हणाले की,आमच्या सब ब्रॅण्डच्या माध्यमातून भारताच्या बाजारपेठेत पुनरागमन करण्याबद्दल आम्हाला अत्यंत आनंद झाला आहे. जेव्हा तुम्ही किंवा “इन” असे शब्द ऐकता तेव्हा तुमच्या मध्ये जबाबदारीची भावना निर्माण होते तुमच्या मनामध्ये अनेक आशा निर्माण होतात. परंतु त्यापेक्षाही अधिक तुम्हाला अभिमानास्पद वाटते. “इन” मोबाईल्स च्या माध्यमातून पुन्हा जागतिक स्मार्टफोनच्या श्रेणीत ओळख निर्माण देणे हा आमचा प्रयत्न आहे.

भारत जगातील पहिल्या पाच मोबाइल गेमिंग मार्केटपैकी एक आहे आणि “इन” ब्रँडच्या सहाय्याने आम्ही ग्राहकांना त्यांची गोपनीयतेचा जपत, उच्च कार्यक्षमता देणारी उत्पादने प्रदान करून त्यांना पुढे जाण्याची संधी देऊ.

ब्रॅण्डचा नवीन अवतार मजेदार,धाडसी आणि महत्वकांक्षी भारतीय पिढीला प्रेरित आहे जे त्यांचा डिजिटल प्रवास सुरु करण्यासाठी उत्तम प्रदर्शन देणाऱ्या उत्पादनांच्या शोधात आहेत आणि भारताची यशस्वितता सांगण्यासाठी सज्ज आहे. ब्रँडचा कलर आणि विज्युअल आयडेंटिटी संपूर्ण हिंदुस्थानींची ओळख असलेल्या निळ्या रंगाला प्रेरित आहे. निरंतर प्रदर्शन आणण्याच्या तसेच एक सुरक्षित वापरकर्ता अनुभव प्रदान करण्याच्या ब्रँडच्या वचनबद्धतेसह मायक्रोमॅक्सने समग्रपणे स्मार्टफोन इकोसिस्टम तयार आणि वाढवण्याची योजना आखली आहे, ज्याचा ग्राहकांना निश्चितच फायदा होईल.

– YouTube link: https://youtu.be/aRo69b1wTNg

स्मार्टफोन विभागात धोरणात्मक पद्धतीने प्रवेश करण्यासाठी मायक्रोमॅक्सने ५०० कोटींची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे तसेच मायक्रोमॅक्स नव्या युगातील भारतीय ग्राहकांसाठी ग्राउंड-अप उत्पादने देखील तयार करेल. तसेच ‘इन’ ब्रँडच्या अंतर्गत स्मार्टफोनची नवीन श्रेणी देखील सादर करण्यात येईल.

भिवाडी आणि हैद्राबादसह मायक्रोमॅक्सकडे भारतात २ ठिकाणी अत्याधुनिक उत्पादन सुविधा देखील उपलब्ध आहे. प्रत्येक महिन्यात जवळपास २ दशलक्ष फोन निर्माण करण्याची या ब्रँडची क्षमता आहे. या व्यतिरिक्त ब्रँड त्यांचे आधीच प्रस्थापित झालेले किरकोळ आणि वितरण नेटवर्क अधिक बळकट करण्यासाठी देखील कार्य करीत आहे. सध्या मायक्रोमॅक्सचे संपूर्ण भारतात १०,००० पेक्षा अधिक किरकोळ आउटलेट्स आणि १००० पेक्षा अधिक सेवा केंद्रे आहेत.

मायक्रोमॅक्सकडे अनेक उच्च स्तरीय उत्पादने आहेत ज्यामध्ये बॅटरीची दीर्घकाळापर्यंत क्षमता असलेले फोन, ड्युअल सिम फोन,क्वेर्टी डिवाईस, गेमिंग डिवाइस, वूमेन्स लाईन ऑफ डिवाईसेस, युनिवर्सल रिमोट कंट्रोल फोन,एमटीवी फोन, डॉकेबल ब्ल्युटूथ डिवाइस आणि एड्यूटेनमेंट टॅबलेट यांचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या